logo

महादेव वाघमारे (गुरुजी) यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,

मुंबई - कवठे महांकाळचे सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे (गुरुजी) यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार संजय सावकारे सामाजिक न्याय व विशेष साई विभागाचे सचिव सुमंत भांगे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या शुभहस्ते शाल सन्मानचिन्ह संविधानाची प्रत 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडामंत्री संजय बनसोडे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आ.किशोर जोरगेवार लक्ष्मणराव ढोबळे यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातून सन 2019-20 चा पुरस्कारासाठी महादेव वाघमारे गुरुजी यांची निवड करण्यात आली शिक्षक म्हणून विद्यार्थ्याप्रती असलेले आस्था,प्रेम, जिव्हाळा यातून अनेक संस्कारित विध्यार्थी घडवले आज शिक्षणावरची व समाज्याप्रती निष्ठा व तपस्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणारे वाघमारे गुरुजी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन ,वृक्षारोपण, साक्षरता अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, जनगणना याचबरोबर शिव ,फुले, शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ,लजी वस्ताद,जिजाऊ,सावित्रीबाई फुले,माता रमाई, भिमाई, अहिल्यादेवी यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम समाजामध्ये जनजागृती करून केलं समाजातील तळागाळातील लोकांना दवाखाना, लग्नकार्य, शेती, शिक्षण,रोजगार यामध्ये लागेल ती मदत करून अनेक संसार फुलवण्याचे काम तन मन व गधन अर्पूण गुरुजींनी केले याची दखल घेत त्याचा योग्य तो सन्मान शासनाच्यावतीने करण्यात आला याप्रसंगी पुरस्कार घेताना त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी कवठे महांकाळ नगरीच्या एकमेव महिला माजी सरपंच सौ बबुताई वाघमारे,मुलगा प्रा. अमोलकुमार वाघमारे, सून सुप्रिया वाघमारे उपस्थित होत्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 300 व्यक्ती व 100 संस्था यांना शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या नरिमन पॉईंट मधील डॉ. जमशेदजी भाभा सभागृहामध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात जवळपास 5000 लोक राज्यातून उपस्थित होते.

102
2901 views